पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षय कुमारनं मागितलं १२० कोटींचं मानधन?

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. वर्षाला इतर सहकाऱ्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त चित्रपटात काम करणाऱ्या या अभिनेत्यानं एका चित्रपटासाठी १२० कोटींचं मानधन मागितल्याच्या चर्चा आहेत. 

..जेव्हा तहानलेल्या मुलीला अक्षय पाण्यासाठी झोपडीत घेऊन गेला

अक्षय आनंद  एल रॉय यांच्या  आगामी चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे, यात सारा अली खान आणि धनुषही दिसणार आहेत. या चित्रपटासाठी अक्षयनं एवढी मोठी रक्कम मानधन म्हणून मागितल्याच्या चर्चा आहेत. गेल्यावर्षात अक्षयच्या प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी एकूण ७०० कोटींचा गल्ला जमवला होता. 'अक्षयच्या चित्रपटांकडे प्रेक्षक अधिकाधिक संख्येनं आकर्षित होतो, त्याच्या चित्रपटाचे  डीजिटल आणि सॅटेलाईट  हक्कही अधिक किमतीला विकले जातात. त्यामुळे अक्षयला १०० कोटींपेक्षा अधिक मानधन मिळालं पाहिजे असं अक्षयच्या टीमलाही वाटतं.' अशी माहिती सुत्रानं बॉलिवूड हंगामाला दिली आहे. 

Video : नील- पूर्वीच्या पहिल्या प्रेमाची पहिली नशा

अक्षयनं  सर्वाधिक मानधन घेतलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण या वर्षांच्या मध्यापासून सुरु होणार आहे. अक्षयचे 'बच्चन पांड्ये', 'बेल बॉटम', 'लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज' यांसारखे काही चित्रपट या वर्षांत प्रदर्शित होत आहेत.