पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुग्णालयात दाखल असलेल्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्च अक्षयनं उचलला

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार हा नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो, आतापर्यंत अक्षयनं अनेक गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. पूरग्रस्त तसेच  शहीदांच्या कुटुंबीयांसाठीही अक्षयनं सढळ हस्ते मदत केली आहे. अक्षयनं 'मिशन मंगल' या चित्रपटाच्या दिग्दर्शकाच्या उपचारांचा खर्चही उचलला असल्याचं समजत आहे. 

 

सरोज खानविरोधात गणेश आचार्य मानहानीचा दावा ठोकणार

'मिशन मंगल'चे दिग्दर्शक जगन शक्ती यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. अक्षयनं  'मिशन मंगल' चित्रपटात काम केलं आहे. २०१९ मधल्या सुपरहिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट ठरला होता. त्यामुळे जेव्हा जगन शक्ती यांच्या तब्येतीबद्दल कळलं, अक्षयच्या टीमनं त्वरीत जगन शक्ती यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला.

बॉक्स ऑफिसवर 'अक्षय कुमार' विरुद्ध 'अक्षय कुमार' टक्कर टळली

अक्षयनं आतापर्यंत अनेक दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे, तो प्रत्येकाशी जोडला गेला आहे. जगन शक्ती यांच्या तब्येतीबद्दल कळाल्यानंतर अक्षयनं संपर्क साधत त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची तयारी दर्शवली. रुग्णालयातील सर्व उपचाराचा खर्च अक्षय स्वत: करत असल्याची माहिती सुत्रांनी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली.