पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Laxmmi Bomb : 'लक्ष्मी'च्या रुपातला अक्षय पाहिलात का?

लक्ष्मी बॉम्ब

अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अॅक्शन हिरो' म्हणून ओळखला जाणारा अक्षय गेल्या काही वर्षांत वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडत आहे.  यातली एक भूमिका म्हणजे 'लक्ष्मी बॉम्ब' मधील होय. अक्षय या चित्रपटात एका तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. 

प्रेक्षकांसाठी ट्रिपल धमाका, 'सूर्यवंशी', 'सिंघम' आणि 'सिम्बा' एकाच चित्रपटात

नवरात्रीच्या मुहूर्तावर अक्षयनं या चित्रपटातील स्वत:चा पहिला लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.  'नवरात्री म्हणजे तुमच्या आत असलेल्या शक्तीपुढे नतमस्तक होणं होयं. या शुभ मुहूर्तावर मी लक्ष्मीचा पहिला लूक तुमच्यासमोर आणत आहे. ही भूमिका साकारताना मी उत्सुकही होतो आणि मला भीतीही वाटत होती. मात्र जेव्हा तुम्ही चौकट मोडता तेव्हाच नव्या आयुष्याला सुरूवात होते', असं लिहित अक्षयनं त्याचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

Video : रणवीरचा 'अवतार' पाहून चिमुकली घाबरून लागली रडू

ही भूमिका अक्षयसाठी चाकोरीबाहेरची होती आणि यासाठी त्यानं विशेष मेहनत घेतली. हा चित्रपट दक्षिणेतल्या गाजलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'कंचना'चा हा रिमेक असणार आहे. राघव लॉरेन्स या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून अक्षयसोबत किआरा अडवाणीही यात पहायला मिळणार आहे. ५ जून २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.