पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोल्हापूर- सांगली पूरग्रस्तांना अक्षय कुमारचा भावनिक संदेश, सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन

अक्षय कुमार

कोल्हापूर आणि सांगलीत पुरानं थैमान घातलं. हजारो लोक बेघर झाले आहेत. कित्येकानं आपले प्राण, जीवाभावाची माणसं गमावली आहेत. पूराचं पाणी ओसरलं असलं तरी पूरामुळे झालेलं नुकसान भरून काढणं हे मोठं आव्हान असणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी कोल्हापूर सांगलीकरांचा संसार उभारण्यासाठी हातभार लावला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारही पूरग्रस्तांसाठी पुढे आला आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

'कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तुम्ही सर्वांनी धीर धरा, असं मी आवाहन करतो. आपण लढून पुढे जायला  छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडून शिकलो आहोत. सरकार आणि कोल्हापूर आपत्ती निवारण तुकडी तुमची सर्वतोपरी मदत करण्यासाठी तत्पर आहेत. मला विश्वास आहे कोल्हापूर आणि सांगली पहिल्यासारखचं सुंदर होईन. मी तुमच्यासोबत नेहमीच आहे, असा भावनिक संदेश अक्षय कुमारनं कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्तांना दिला आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी रितेश- जेनेलियाची २५ लाखांची मदत

 संकटकाळी खचून जाऊ नका असं भावनिक आवाहनही त्यानं पूरग्रस्तांना केलं आहे. दरम्यान मराठी सिने आणि नाट्य कलाकारही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. आर्थिक मदतीबरोबरच, धान्य, जीवनावश्यक वस्तूची मदतही त्यांनी पूरग्रस्तांना केली आहे.