पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत अक्षय कुमार चौथ्या स्थानी

अक्षय कुमार

फोर्ब्स मासिकाकडून दरवर्षी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांची यादी जाहीर केली जाते. यंदा फोर्ब्सनं जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या  कलाकारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचाही समावेश आहे. अक्षय हा सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. अक्षयची एकूण कमाई ही जवळपास ४८६ कोटी आहे. 

अमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप, करणनं अखेर सोडले मौन

या यादीत पहिल्या स्थानावर 'द रॉक'चा समावेश आहे. त्याची एकूण कमाई ही ६३९ कोटी आहे. फोर्ब्सच्या यादीत सहभागी झालेला अक्षय कुमार हा एकमेव बॉलिवूड कलाकार आहे. अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हा चित्रपट नुकताच प्रसदर्शित झाला. या चित्रपटानं ११४ कोटींहून अधिकची कमाई केली आहे.

अभिनेता आदित्य रॉय कपूर या मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा

अक्षय बॉलिवू़डमध्येही सर्वाधिक कमाई करणारा आणि मानधन घेणारा अभिनेता म्हणून ओळखला जातो. येत्या वर्षभरात अक्षयचे 'सूर्यवंशी', 'गूड न्यूज', 'लक्ष्मी बॉम्ब', 'बच्चन  पांड्ये', 'हाऊसफुल्ल ४' यांसारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.