पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : सेटवर बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीला अक्षयनं वाचवलं

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी कॉमेडियन मनिष पॉलच्या शोमध्ये पोहोचला. कार्यक्रमातील एका स्टंटमध्ये सहभागी झालेला टीमचा सदस्य स्टंट करतानाच बेशुद्ध पडला. अक्षय कुमार आणि कार्यक्रमाची संपूर्ण टीम वेळ न दवडता मदतीला  धावून गेली. 

विश्वासू नोकराने सचिन पिळगावकरांची सन्माचिन्हे चोरून भंगारात विकली

 अक्षय कुमार 'हाऊसफुल ४' चं प्रमोशन करण्यासाठी मनीष पॉलच्या शोमध्ये पोहोचला होता. शोच्या एका स्कीटमध्ये कॉमेडियन अली असगर टीममधल्या एका सदस्यासोबत मिळून स्टंट करत होता.  सुरक्षेचा उपाय म्हणून या दोघांना सुरक्षा तारेनं बांधण्यात आलं होतं.  जमिनीपासून दोघंही काही फूट उंच हवेत होते. दोघांच्या पायाखाली पाण्यानं भरलेली टाकी होती. 

हृतिक- टायगरच्या 'वॉर'नं मोडले ८ विक्रम

टीममधला सदस्य स्टंट करताना बेशुद्ध पडला हे लक्षात येताच अलीनं त्याला सावरायचा प्रयत्न केला. सुरक्षा तार बांधली असल्यानं  अलीला फारशी हालचाल करता येत नव्हती मात्र अलीनं त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला.  क्षणाचा विलंब न करता  अक्षय धावत गेला आणि या  व्यक्तीला सुरक्षित खाली उतरवण्यात मदत केली.