पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयसाठी 'द कपिल शर्मा शो'मध्ये होणार हा सर्वात मोठा बदल

द कपिल शर्मा शो

अभिनेता अक्षय कुमार आणि हाऊसफुल ४ ची संपूर्ण टीम 'द कपिल शर्मा शो'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. मात्र अक्षयनं यासाठी कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमला कामात मोठा बदल करण्यासाठी सांगितला आहे. अक्षयनं 'द कपिल शर्मा शो'चं चित्रीकरण सकाळी ६.३०  वाजता सुरू करण्याची विनंती केली आहे. 

दयाबेनच्या कमबॅकमध्ये आणखी एक वळण, मालिकेत परतणार पण....

अक्षय हा फिटनेसला प्राधान्य देणारा अभिनेता आहे. त्याचा दिनक्रम सकाळी लवकर सुरू होतो. त्यानं 'द कपिल शर्मा शो'च्या टिमला सकाळी लवकर ६.३०  चित्रीकरण सुरू करण्याची विनंती केली असल्याची माहिती मुंबई मिररनं दिली आहे. त्यामुळे कपिलच्या टीमला पहाटे ४ वाजल्यापासूनच चित्रीकरणाची तयारी करावी लागणार आहे.

...म्हणून स्वत:च्या लग्नात राधिकानं नेसली आजीची फाटलेली साडी

एरव्ही 'द कपिल शर्मा शो'चं चित्रीकरण हे दुपारनंतर सुरू होतं. यापूर्वी रात्री उशीरा चित्रीकरण सुरू होऊन मध्यरात्रीपर्यंतही चित्रीकरण चालायचं मात्र गर्भवती पत्नी गिन्नीला वेळ देता यावा यासाठी कपिलनं चित्रीकरणाच्या वेळापत्रकात बदल केला होता. 

कपिल प्रत्येक एपिसोडसाठी घेतो इतके मानधन, उदित नारायण यांची पोलखोल

आता अक्षयसाठी कपिल  पुन्हा एकदा लवकर चित्रीकरण सुरू करणार असल्याचं समजत आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या भागात अक्षय सोबत रितेश देखमुख, बॉबी देओल आणि चंकी पांड्ये सारखे कलाकार उपस्थित राहणार आहेत.