पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयवर चित्रपटांचा पाऊस, २०-२१ मध्ये प्रदर्शित होणार हे चित्रपट

अक्षयवर चित्रपटांचा पाऊस

बॉलिवूडचा सर्वात महागडा कलाकार अक्षय कुमारकडे सर्वाधिक चित्रपट आहेत. सध्याच्या घडीला क्वचितच एखाद्या बॉलिवूड कलाकाराच्या वाट्याला इतके चित्रपट आले असतील. २०१८-१९ वर्ष गाजवल्यानंतर आता २०२०- २१ वर्षांत अक्षयचे कोणते नवे चित्रपट प्रदर्शित होत आहेत ते पाहू. 

VIDEO: अक्षय कुमारच्या 'अतरंगी रे'चा टीझर प्रदर्शित

सूर्यवंशी 
अक्षयची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. २७ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.  सिंघम, सिंघम रिटर्न, सिम्बानंतर रोहितचा चौथा पोलिसांवर आधारित चित्रपट येत आहे. कतरिना कैफ चित्रपटात अक्षयसोबत दिसणार आहे.

रणवीरच्या 'जयेशभाई जोरदार'मध्ये ही अभिनेत्री आईच्या भूमिकेत

लक्ष्मी बॉम्ब 
आतापर्यंत विविध भूमिका साकारलेला अक्षय कुमार  लक्ष्मी बॉम्ब चित्रपटात एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. किआरा अडवाणी देखील त्याच्यासोबत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट तामिळ चित्रपट कंचनाचा रिमेक आहे. ईद २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

 

पृथ्वीराज 
अक्षय त्याच्या बॉलिवूड कारकिर्दीत पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

बच्चन पांडे 
अक्षयनं या चित्रपटात देखील एका वेगळ्या भूमिकेची निवड केली आहे. क्रिती सॅनॉन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून २२ जानेवारी २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

बेल बॉटम 
'बेल बॉटम' चित्रपट  २ एप्रिल २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  गुप्तचर यंत्रणेवर हा चित्रपट आधारलेला असल्याचं म्हटलं जात आहे.

अतरंगी रे 
अतरंगी रे या चित्रपटात अक्षय हा सारा अली खान आणि धनुष्यसोबत दिसणार आहे.  पहिल्यांदाच हे त्रिकुट एकत्र काम करत आहे.