पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयनं पत्नीला भेट दिले कांद्याचे झुमके

अक्षयनं पत्नीला भेट दिले कांद्याचे झुमके

अभिनेता अक्षय कुमारनं पत्नी ट्विंकल खन्नाला एक हटके गिफ्ट दिलं आहे. या गिफ्टची चर्चा आता सगळीकडे पहायला मिळत आहे. अक्षयनं ट्विंकलला चक्क कांद्याचे झुमके  भेट दिले आहेत. 

अक्षयनं सांगितलं कॅनडाचं नागरिकत्त्व स्वीकारण्यामागचं खरं कारण

 अक्षयनं नुकतीच द कपिल शर्मा शोमध्ये उपस्थिती लावली होती. तो आगामी चित्रपट गूड न्यूजच्या प्रमोशनसाठी करिनासोबत कपिल शर्माच्या सेटवर आला होता. ' माझा नवरा नुकताच द कपिल शर्मा शोमधून घरी परतला. त्यानं माझ्या हातात ही भेटवस्तू दिली.  ही भेट त्यांनी आधी करिनाला दिली होती. मात्र तिला काही ही भेट आवडली नाही. पण मला ती नक्की आवडेल हे अक्षयला माहिती होतं, त्यामुळे त्यानं ही भेट माझ्यासाठी आणली' असं म्हणत ट्विंकलनं हा कांद्याच्या झुमक्यांचा फोटो शेअर केला आहे. 

..जेव्हा तहानलेल्या मुलीला अक्षय पाण्यासाठी झोपडीत घेऊन गेला

सध्या देशात कांद्याच्या भावानं उच्चांक गाठला आहे. अनेक ठिकाणी कांद्यांच्या भावानं शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी कांदा ही जणू चैनीची वस्तू झाली आहे. 

'जय मम्मी दी'चा धम्माल ट्रेलर पाहिलात का?