पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयची ब्रँड व्हॅल्यू वधारली, दीपिका- आमिरलाही टाकलं मागे

अक्षयची ब्रँड व्हॅल्यू वधारली

बॉलिवूडमध्ये 'अक्षय कुमार' हा नवा ब्रँड झाला आहे, असं म्हणायला हरकत नाही. २०-२१ वर्षांसाठी 'पृथ्वीराज', 'सूर्यवंशी', 'लक्ष्मी बॉम्ब', 'बेलबॉटम',  'बच्चन पांडे',  'अतरंगी रे' असे सर्वाधिक चित्रपट करारबद्ध  करणारा अक्षय हा बॉलिवूडमधला आघाडीचा आणि सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. सध्याच्या घडीला अक्षय कुमारची ब्रँड व्हॅल्यूही ७४० कोटींच्या घरात आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोनलाही मागे टाकत अक्षय कुमारनं सर्वाधिक ब्रँड  व्हॅल्यू असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे. या यादीत पहिल्या स्थानी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. Duff and Phelp ची  २०१९ मधील सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यूची यादी समोर आली आहे. 

औरंगाबाद जळीतकांडातील महिलेचा मृत्यू

यापूर्वी या यादीत अभिनेत्री दीपिका पादुकोन दुसऱ्या स्थानावर होती. मात्र जेएनयु विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर दीपिकाला याचा मोठा फटका बसला. तिचं याच यादीत स्थान घसरून तिसऱ्या क्रमांकावर आलं आहे. दीपिकाची सध्याच्या घडीला ब्रँड व्हॅल्यू ही ६६५ कोटींच्या आसपास आहे. चौथ्या स्थानावर दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंग आहे.  पाचव्या आणि सहाव्या स्थानी शाहरुख खान आणि सलमान खान आहे. 

स्वराज्यरक्षक संभाजी : पवारांना यात गोवण्याचा प्रयत्न हीन दर्जाचा

या यादीत अभिनेता आमिर खानची मात्र मोठी घसरण पहायला मिळाली आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमिर १६ व्या स्थानी  आहे. तर आयुष्यामान खुरानानं या यादीत पहिल्या दहामध्ये स्थान मिळवलं आहे.  'विकी डोनर', 'अंधाधून', 'बधाई हो', 'ड्रिम गर्ल', 'बरेली की बर्फी', 'आर्टिकल १५' सारखे लागोपाठ हिट चित्रपट आयुष्माननं दिले आहेत. सध्याच्या घडीला बॉलिवूडमधल्या लोकप्रिय अभिनेत्यापैकी तो आहे त्यामुळे अर्थात आयुष्मानची ब्रँड व्हॅल्यू  वधारली आहे. 

कोरोनामुळे भारतातील हिरे व्यापारास ८ ते १० हजार कोटींचा फटका