पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

HTLS 2019 : नरेंद्र मोदींच्या त्या मुलाखतीबद्दल अक्षय कुमार म्हणाला...

अक्षय कुमार

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेण्याची संधी मिळते आहे म्हटल्यावर कोणीही पळत पळत गेले असते. मी केवळ एक सामान्य माणूस म्हणून मला जे प्रश्न योग्य वाटले ते नरेंद्र मोदींना विचारले आणि त्यांनीही त्याची सहजपणे उत्तरे दिली, असे अभिनेता अक्षय कुमार याने शुक्रवारी सांगितले. हिंदुस्थान टाइम्स लीडरशीप समिटमध्ये शुक्रवारी अक्षय कुमार आणि अभिनेत्री करिना कपूर सहभागी झाले होते. त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नाला त्याने हे उत्तर दिले.

अक्षयनं सांगितलं कॅनडाचं नागरिकत्त्व स्वीकारण्यामागचं खरं कारण

लोकसभा निवडणुकीपूर्वी अक्षय कुमार याने नरेंद्र मोदी यांची घेतलेली मुलाखत गाजली होती. या मुलाखतीचे अनेकांनी कौतुक केले तर अनेकांनी त्यावर टीकाही केली होती. त्या पार्श्वभूमीवर अक्षय कुमार याने या मुलाखती मागची आपली भावना सांगितली. अक्षय कुमार म्हणाला, खरंतर नरेंद्र मोदींची मुलाखत घेण्यासाठी कोणीही पळत पळत गेला असता. मी कोणतीही पूर्वतयारी न करता ही मुलाखत घेण्यासाठी गेलो होतो. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे मी त्यांना प्रश्न विचारले. त्यांनी ठरवलं असतं तर मला मुलाखतीतून बाहेर फेकलं असतं. पण नरेंद्र मोदींनी माझ्या सगळ्या प्रश्नांची मनापासून उत्तरं दिली, असे अक्षय कुमार म्हणाला. 

त्या मुलाखतीपूर्वी कोणते प्रश्न विचारायचे असे मला काहीही सांगण्यात आले नव्हते. त्याचबरोबर कोणते प्रश्न विचारणार हे मला कोणीही विचारले सुद्धा नव्हते, असेही अक्षय कुमार याने स्पष्ट केले.

अनैतिक संबंधांच्या संशयावरून सासऱ्याचा सूनेवर आणि पत्नीवर चाकूने हल्ला

माझ्या घरामध्ये पत्नी ट्विंकल खन्ना आणि माझ्यात वैचारिक मतभेद असल्याचे अक्षय कुमारने स्पष्ट केले. अगदी हलकेपणाने आपला मुद्दा मांडताना अक्षय कुमार म्हणाला, आमच्या घरात एक दिवस रिपब्लिक चॅनेल लागते तर एक दिवस एनडीटीव्ही सुरू असते. पण आता आमचे एकमत झाले असून, आम्ही दोघे एबीपी टीव्ही बघतो, असे त्याने सांगितले.