पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'हाऊसफुल 4' च्या कमाईचा आकडा खरा की नुसता फुगवटा? अक्षय म्हणतो...

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमारसह अनेक कलाकारांची भूमिका असलेला हाऊसफुल ४' चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाची आता १५० कोटींच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे. मात्र  चित्रपटाच्या कमाईचे आकडे हे खोटे असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

पण कमाईचे आकडे हे खरेच असल्याचं अक्षयनं म्हटलं आहे.  हाऊसफुलच्या कमाईच्या आकड्यांवरून होणाऱ्या वादावर अक्षयला विचारलं असता त्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. 'चित्रपटाच्या कमाईचे  आकडे हे नेहमी खरेच असतात. ते कोणीही वाढवून सांगत नाही. ज्यांना यावर विश्वास नसेल त्यांनी चित्रपटांच्या मालकांकडे जाऊन याची शहानिशा करावी. मात्र कमाईचे आकडे मी सांगितलेले नाही. मला प्रश्न विचारण्यात आला यावर केवळ मी आपलं मत व्यक्त केलं', असं अक्षयनं म्हटलं आहे. 

..जेव्हा तहानलेल्या मुलीला अक्षय पाण्यासाठी झोपडीत घेऊन गेला

'या चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टुडिओनं देखील केली आहे. हे निर्मिती क्षेत्रातलं सर्वात मोठं आणि विश्वासू नाव आहे. त्यामुळे कमाईचे आकडे ते तिथून आले आहे. तिथूनचं कमाईची माहिती इतर ठिकाणी पोहोचते, तेव्हा कमाई खोटी असल्याचे तथ्यहिन दावे करण्यापेक्षा आपण विचारपूर्वक यावर चर्चा करू असंही अक्षय म्हणाला. 

भर पावसातही शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी

हाऊसफुल ४ मध्ये अक्षयसह बॉबी देओल, पूजा हेगडे, रितेश देखमुख, क्रिती सॅनॉन यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटानं कमी वेळात १०० कोटींचा टप्पा पार केला. मात्र चित्रपटाची कमाई ही खोटी असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.