पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे अक्कीच्या बहुचर्चित 'सूर्यंवशी'ची प्रतिक्षा वाढली

अक्षयच्या आगामी चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

वर्षभरापासून चाहते ज्या 'सूर्यवंशी'ची वाट पाहत आहेत त्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता लांबणीवर गेली आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारने कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होणार नसल्याचे जाहीर केले. योग्य वेळी चित्रपट प्रदर्शित करु, असा उल्लेखही अक्कीने शेअर केलेल्या ट्विट पोस्टमध्ये केला आहे. २४ मार्चला 'सूर्यवंशी' हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.  

VIDEO : सूर्यवंशीचा 'Power-packed' ट्रेलर पाहिलात का?

अक्षय कुमारने यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांना देण्यासाठी ट्विटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहलंय की,  'आम्ही वर्षभर मेहनत घेऊन तुमच्यासाठी 'सूर्यवंशी' हा चित्रपट तुमच्यासाठी तयार केला आहे. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळेल ही झलक ट्रेलरला मिळत असलेल्या लोकप्रियतेतून दिसून येते. तुमच्या प्रमाणेच आम्हीही चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी उत्सुक आहोत. पण कोरोना विषाणूचे संकट पाहाता आमच्या टीमने चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. चाहत्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटीच हा निर्णय घेतला असून योग्य वेळी चित्रपट प्रदर्शित करु. 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या 'सूर्यवंशी' ची गोष्ट रोहित शेट्टी यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट २४ तास चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येईल, अशी घोषणा देखील करण्यात आली होती. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत रोहित शेट्टीच्या cop universe मधी लोकप्रिय पोलिस 'सिंघम' म्हणजेच अजय देवगन आणि 'सिम्बा' म्हणजे रणवीर सिंगही दिसणार आहेत.