पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... आणि 'मिशन मंगल'चे 'मिशन १०० कोटी'त पदार्पण

मिशन मंगल

अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी, नित्या मेनन आणि शर्मन जोशी यांची प्रमुख भूमिका असलेल्या मिशन मंगलने सोमवारी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा व्यवसाय केला. अत्यंत जलदगतीने १०० कोटी कमाविणारा अक्षय कुमारचा हा पहिलाच सिनेमा आहे.

कलम ३७० वरून ट्रोल झाल्यावर सोनम कपूरने दिले असे उत्तर...

बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉममधील रिपोर्टनुसार, सोमवारी मिशन मंगलने बॉक्स ऑफिसवर ८.५० कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे प्रदर्शित झाल्यानंतर आतापर्यंत या सिनेमाने १०७ कोटी रुपये कमाविले आहेत. या आधी अभिनेता रजनीकांतची प्रमुख भूमिका असलेल्या २.० सिनेमाने प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई केली होती. या सिनेमातही अक्षय कुमार बंडखोराच्या भूमिकेत होता. अक्षय कुमारचा याआधीचा प्रदर्शित झालेला सिनेमा केसरीला १०० कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यासाठी एक आठवडा लागला होता.

बिग बॉस मराठी : घरामध्ये रंगणार 'बिचुकले की अदालत' हे कार्य

मिशन मंगलसोबतच जॉन अब्राहम याची प्रमुख भूमिका असलेला बाटला हाऊस सिनेमा प्रदर्शित झाला होता. बाटला हाऊसने सोमवारपर्यंत ५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.