पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Laxmmi Bomb : अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा फर्स्ट लूक

लक्ष्मी बॉम्ब

अभिनेता अक्षय कुमार गेल्या काही वर्षांत वेगळ्या धाटणीच्या भूमिका निवडत आहे. विनोदी, गंभीर, रोमँटिक भूमिकांबरोबरच सामाजिक विषयांवरील चित्रपटानांही अक्षयनं प्राधान्य दिलं.  'पॅडमॅन',  'रुस्तम', 'एअरलिफ्ट', 'टॉयलेट' एक प्रेमकथासारखे त्याचे चित्रपट  खूपच गाजले. आता अक्षय एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येत आहे. अक्षयनं त्याचा चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब'चा पहिला  लूक  प्रदर्शित केला  आहे.

डोळ्यात काजळ भरतानाचा त्याचा हा लूक चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे. पोस्टर लाँच झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता पहायला मिळत आहे.  दक्षिणेतल्या गाजलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'कंचना'चा हा रिमेक असणार आहे. डीएनएच्या वृत्तानुसार या चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या भूमिकेची छोटीशी झलक पोस्टरमधून पहायला मिळत आहे. राघव लॉरेन्स या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून अक्षयसोबत किआरा अडवाणीही यात पहायला मिळणार आहे.

लवकरच तुमच्या भेटीला एक बॉम्ब स्टोरी घेऊन येत आहे असं लिहित अक्षयनं चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. हा चित्रपट ५ जून २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.  अक्षयचा ट्रान्सजेंडर लूकमधील फोटो पाहून हा चित्रपट त्याच्या अनेक चित्रपटांपेक्षा वेगळा ठरणार हे नक्की.