पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इंशाअल्लाह'ऐवजी हा चित्रपट होणार ईदला प्रदर्शित

'इंशाअल्लाह' ईदला प्रदर्शित होणार नाही

सलमान खान आणि आलिया भट्टचा 'इंशाअल्लाह' २०२० मध्ये ईदला प्रदर्शित होणार होता. मात्र 'इंशाअल्लाह'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. या चित्रपटाच्या कामाला तूर्त स्थगिती दिल्याची घोषणा संजय लीला भन्साळी यांच्या  निर्माता संस्थेनं केली आहे. याऐवजी दुसरा कोणता चित्रपट प्रदर्शित होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. आता ईदला प्रदर्शित होणाऱ्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. 

..म्हणून ईदला प्रदर्शित होणार नाही सलमान- आलियाचा 'इंशाअल्लाह'

अक्षय कुमार- किआरा अडवाणीचा  'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट आता ईदला प्रदर्शित होणार आहे.  हा चित्रपट आधी ५ जून २०२० मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार  'लक्ष्मी बॉम्ब' आता २२ मे २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. दक्षिणेतल्या गाजलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपट 'कंचना'चा हा रिमेक असणार आहे. या चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. राघव लॉरेन्स या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.

'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकमध्ये हृतिकसोबत अनुष्का?

'इंशाअल्लाह' चित्रपटाला तूर्त स्थगिती दिली असली तरी यादिवशी तुमच्या नक्की भेटीला येईन असं आश्वासन सलमाननं आपल्या चाहत्यांना दिलं आहे. सलमान आणि ईद हे समीकरण ठरलेलं  आहे. दरवर्षी सलमान ईदला आपला चित्रपट प्रदर्शित करतो. यंदा त्याचा 'इंशाअल्लाह' प्रदर्शित होणं अपेक्षित होतं. मात्र आता त्याऐवजी सलमानचा 'किक २' चित्रपट प्रदर्शित होईन अशाही चर्चा आहेत. चाहत्यांना 'किक २' च्या औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे.