पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO : सूर्यवंशीचा 'Power-packed' ट्रेलर पाहिलात का ?

सूर्यवंशी

गेल्या वर्षभरापासून चाहते ज्या 'सूर्यवंशी'ची वाट पाहत होते त्या 'सूर्यवंशी' चित्रपटाचा 'Power-packed' ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. वर्षभरापासून चित्रपटाबद्दल कमलीची उत्सुकता चाहत्यांना होती. २०१८ साली रणवीर सिंगच्या 'सिम्बा' चित्रपटाच्या शेवटी 'सूर्यवंशी'ची घोषणा करत दिग्दर्शक रोहित शेट्टीनं चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. 

तृतीयपंथीयांसाठी घर बांधण्याकरता अक्षयनं दिले १.५ कोटी

या चित्रपटाच्या निमित्तानं रोहित शेट्टीच्या cop universe म्हणजेच पोलिसांवर आधारित चित्रपटांच्या सीरिजमध्ये अक्षय कुमारचाही समावेश झाला आहे. यापूर्वी 'सिंघम', 'सिंघम रिटर्न' आणि 'सिम्बा' या तीन चित्रपटांना मिळालेल्या धडाकेबाज यशानंतर दहशतवाद विरोधी पथकातील अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित  'सूर्यवंशी' हा चित्रपट रोहित शेट्टी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन  येत आहे.  विशेष म्हणजे या चित्रपटात अक्षय कुमारबरोबरच रोहित शेट्टीच्या cop universe मधले लोकप्रिय पोलिस 'सिंघम' म्हणजेच अजय देवगन आणि 'सिम्बा' म्हणजे रणवीर सिंगही पाहायला मिळणार आहे. 

'स्टारकिड्समुळे मलाही चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला होता'

आर्थिक राजधानी मुंबईवर होणाऱ्या दहशवादी हल्ल्याचा कट उधळून लावण्यासाठी दिवस रात्र एक करणाऱ्या  'सूर्यवंशी' ची गोष्ट या चित्रपटात पाहयला मिळणार आहे. २४ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे  विशेष म्हणजे हा चित्रपट २४ तास चित्रपटगृहांमध्ये सुरु राहणार आहे. 

दीपिकाच्या 'द इंटर्न'मधून ऋषी कपूर घेणार माघार?