‘फोर्ब्स’नं नुकतीच सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. ‘फोर्ब्स’च्या यादीत अक्षय कुमार या एकमेव भारतीय सेलिब्रिटीचा समावेश आहे. ‘फोर्ब्स’नं जगभरातील १०० सेलिब्रिटींची यादी जाहीर केली. यात अक्षय ३३ व्या क्रमांकावर आहे. तर अमेरिकन गायिका टेलर स्विफ्ट अग्रस्थानी आहे. २०१६ मध्ये ती अग्रस्थानी होती.
अभिनेता इम्रान हाश्मीनं घेतली अलिशान कार
अक्षय कुमारनं रिहाना, जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांना मागे टाकत हे स्थान पटकावलं आहे. अक्षय कुमार हा सध्याच्या काळात आघाडीचा अभिनेता आहे. त्यानं अनेक यशस्वी चित्रपट गेल्या दशकभराच्या काळात दिले आहेत. पण त्याचबरोबर अक्षय अनेक ब्रँडचा सदिच्छा दूत देखील आहे. या वर्षभरात त्याचे ‘मिशन मंगल’, ‘हाऊसफुल ४’, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’, ‘लक्ष्मी बॉम्ब’ यांसारखे चित्रपटाही प्रदर्शित होत आहे.
हृतिकचा 'सुपर ३०' या चार कारणांसाठी नक्की पाहावा
अक्षय कुमार हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता तर आहेच पण या देशातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांच्या यादीतही त्याचा समावेश आहे. २०१९ च्या निवडणुकांदरम्यान नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावरून तो वादात सापडला होता.