पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अक्षयनं मला जीवनदान दिलं, दिग्दर्शकानं मानले आभार

दिग्दर्शकानं मानले अक्षयचे आभार

अक्षयमुळे मला जीवनदान मिळालं आहे अशा शब्दात 'मिशन मंगल'चे दिग्दर्शक जगन शक्ती यांनी अक्षय कुमारचे आभार  मानले आहेत. 

बॉलिवूड, हॉलिवूड विसरा, येतोय झाडीपट्टी रंगभूमीवर आधारित 'झॉलिवूड'

'मिशन मंगल'चे दिग्दर्शक जगन शक्ती यांच्यावर गेल्या महिन्यात शस्त्रक्रिया पार पडली. त्यांच्या मेंदूत रक्ताची गाठ आढळली होती. त्यामुळे जानेवारीमध्ये त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. अक्षयनं त्यांच्यासोबत  'मिशन मंगल' चित्रपटात काम केलं होतं.  २०१९ मधल्या सुपरहिट चित्रपटांपैकी हा एक चित्रपट ठरला होता. त्यामुळे जेव्हा जगन शक्ती यांच्या तब्येतीबद्दल कळलं, अक्षयच्या टीमनं त्वरीत जगन शक्ती यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. अक्षयनं  जगन शक्ती यांच्या कुटुंबाचा खर्चही उचलला होता.

बँकॉकवरून येताना "गोष्ट एका पैठणीची"चे संवाद पाठच करून आले 'इनामदार'

यानंतर हिंदुस्थान टाइम्सशी बोलतान जगन यांनी कृतज्ञता व्यक्त  केली आहे. अक्षयनं मला जीवनदान दिलं. अक्षयनं मला चित्रपटांची संधीही दिली. आज मी त्याच्यामुळे चालू शकतो अशा शब्दात जगन यांनी  अक्षयचे आभार मानले आहेत.