पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोठे दिग्दर्शक मला कामच देत नाही, अक्षयची खंत

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडमधला आघाडीचा, तसेच सर्वाधिक मानधन घेणार अभिनेता होय. आतापर्यंत अक्षयनं अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. येणाऱ्या काळात त्याचे  'बच्चन पांड्ये', 'गुड न्यूज',  'बेल बॉटम', 'लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज' सारखे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. मात्र मोठे दिग्दर्शक मला कामच देत नाही म्हणून मी नवख्या दिग्दर्शकांसोबत काम करतो अशी खंत अक्षयनं बोलून दाखवली. 

जयेशभाई जोरदार : रणवीर सिंग साकारणार गुज्जू छोकरो

'मोठे लोक त्यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी देत नाही तेव्हा तुम्हाला स्वत:चा मार्ग निवडावा लागतो. ज्यावेळी मोठ्या संधी मिळत नाही तेव्हा अनेक जण लहान लहान संधी शोधतात. मला काम का मिळत नाही याचा विचार करत तुम्ही घरात बसून नाही राहू शकत. म्हणूनच मी  नेहमीच लहान दिग्दर्शकांसोबतच काम करतो कारण मोठे दिग्दर्शक मला त्यांच्या चित्रपटात काम देत नाही, असं अक्षय म्हणाला. 

आई असल्यामुळे 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखलं

अक्षयनं नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. मी आतापर्यंत २१ नव्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. अनेक जुन्या दिग्दर्शकांपेक्षा ते खूप उत्तम काम करतात, त्यांच्यासाठी करो या मरोची परिस्थिती असते, जर चित्रपट चालला नाही तर त्यांचे मार्ग कायमचे बंद होतील अशी भीही त्यांना असते मात्र ते सर्वच उत्तम काम करतात, असंही कौतुकही  अक्षयनं केलं.