पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तृतीयपंथीयांसाठी घर बांधण्याकरता अक्षयनं दिले १.५ कोटी

घर बांधण्याकरता अक्षयनं दिले १.५ कोटी

सामाजिक भान जपत गरजूंना नेहमीच मदत करणाऱ्या अभिनेता अक्षय कुमारनं तृतीयपंथीयांसाठी हक्काचं घर बांधण्याकरता सढळ हस्ते १.५ कोटींची मदत देऊ केली आहे.  

रविनानं केला रिक्षानं प्रवास, तिला पाहून चालकाचा आनंद गगनात मावेना

दाक्षिणात्य दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांच्या ‘लॉरेन्स चॅरिटेबल ट्रस्ट’ ला अक्षयनं तृतीयपंथीयांसाठी घर बांधण्याकरता मदत देऊ केली आहे. गेल्या पंधरावर्षांपासून  शिक्षण, लहानमुलांसाठी घर, दिव्यांग डान्सरनां  मदत आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यासाठी ही स्वयंसेवी संस्था काम करते. ही संस्था १५ व्या वर्षांत पाऊल ठेवत आहे. त्यामुळे या वर्षांत तृतीयपंथीयांना मदत करण्यासाठी ही संस्था पुढे आली आहे. 

आतापर्यंत न पाहिलेला 'लाल सिंग चड्ढा' मधला आमिरचा लूक व्हायरल

या संस्थेद्वारे तृतीयपंथींना जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या जमीनीवर घर बांधण्यासाठी अक्षय मदत करणार आहे. राघव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर अक्षयनं दीड कोटींची मदत केली आहे. या मदतीसाठी राघव यांनी अक्षयचे आभार मानले  आहेत. अक्षय लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन राघव यांनी केले आहे. अक्षय या चित्रपटात तृतीयपंथीयाची भूमिका साकारत आहे. 

'अंधाधून'मध्ये छान काम केलंस, आयुष्मानचं लतादीदींकडून कौतुक