पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या प्रसिद्ध चित्रपटगृहाच्या मदतीला अक्षय आला धावून

अक्षय कुमार

अभिनेता अक्षय कुमार यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनला प्रतिसाद देत गेल्याच महिन्यांत २५ कोटींची मदत पीएम केअर फंडला दिली. आता अक्षय कुमार मुंबईतील प्रसिद्ध गेटी- गॅलेक्सी चित्रपटगृहाच्या मदतीला धावून गेला आहे. वांद्र्यात असलेल्या या चित्रपटगृहाचे मालक मनोज देसाई यांना अक्षयनं आर्थिक मदत देऊ केली आहे अशी माहिती मिड डे या वृत्तपत्रानं दिली आहे. गेटी- गॅलेक्सीचे मालक  मनोज देसाई हे कर्ज काढून आपल्या कर्माचाऱ्यांचे पगार देत आहेत अशी बातमी अक्षयनं वाचली होती. या बातमीनंतर अक्षयनं आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 

Video : लॉकडाऊनमध्ये 'गॅरी'च्या घरात शिजतंय काय?

तीन दिवसांपूर्वी मला अक्षयनं फोन केला होता. आम्हाला आर्थिक मदत करण्याची अक्षयनं तयारी दर्शवली होती, तो खरं तर खूप दिलदार आहे, मात्र या परिस्थितीत टिकून राहायचं असेल तर आम्हालाही नवा मार्ग शोधलाच पाहिजे. या महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार देण्याइतका निधी आमच्याकडे आहे मात्र भविष्यात तोट्याच्या अभावी आमच्यावर कर्मचाऱ्यांची कपात किंवा त्यांचे पगार कपातीची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असं देसाई यांनी मिड डेशी बोलताना सांगितलं.