पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बेल बॉटम : गुप्तहेरांच्या विश्वातली थरारक कथा, अक्षय प्रमुख भूमिकेत

बेल बॉटम

अभिनेता अक्षय कुमारनं त्याच्या आणखी एका नव्या चित्रपटाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. अक्षय लवकरच गुप्तहेरांच्या जीवनावर आधारित चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'बेल बॉटम' असं या चित्रपटाचं नाव असून ८० च्या दशकातील  एका सत्य घटनेपासून चित्रपटाची कथा प्रेरित असल्याची माहिती अभिनेता अक्षय कुमारनं दिली आहे. 

अजय देवगनच्या चित्रपटांचं शतक, 'तान्हाजी' ठरला १०० वा चित्रपट

अक्षयनं चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. अक्षयचा हा चित्रपट कोणत्याही चित्रपटाचा रिमेक नसून चित्रपटाची कथा ही मूळकथा असल्याचं त्यानं सांगितलं आहे. २२ जानेवारी २०२१ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

या चित्रपटाव्यतिरिक्त पुढील वर्षांत अक्षय कुमारचे 'सूर्यवंशी', 'गुड न्यूज', 'लक्ष्मी बॉम्ब', 'पृथ्वीराज', 'बच्चन पांड्ये' हे चित्रपटदेखील प्रदर्शित होत आहे. 

'पानिपत''च्या ट्रेलरचं राज ठाकरेंकडून कौतुक