पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे १०० वे नाट्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोनामुळे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन  पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारी म्हणून या महिन्याच्या शेवटी होणारे  नाट्य संमेलन तूर्त  पुढे ढकण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला असल्याचं समजत आहे.

जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून २७ मार्च रोजी सांगलीत नाट्य संमेलन सुरु होणार होते. संमेलनाचे हे शंभरावं वर्षे आहे. या  संमलेनासाठी राज्य सरकारानं १० कोटींचे अनुदानही दिले होते. 

सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरला, चिंता कायम

मात्र राज्यात कोरोनाचा फैलाव झाला आहे. कोरोनाचे राज्यात १४ रुग्ण आढळले आहेत. खबरदारी म्हणून अनेक मोठे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात १८ मार्चला महत्त्वाची बैठक होणार आहे. 

कोरोनामुळे अक्कीच्या बहुचर्चित 'सूर्यंवशी'ची प्रतिक्षा वाढली

सांगलीतून नाट्य संमलेनाची सुरुवात होणार होती, तीन महिन्यांच्या कालावधीत राज्याच्या विविध शहरात हे नाट्य संमलेन भरवण्यात येणार होते. १४ जूनला मुंबईत संमेलनाचा समारोप होणार होता. मात्र कोरोनामुळे तूर्त ते रद्द करण्यात आलं आहे.