पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजय देवगन उभारणार मल्टीप्लेक्स

अजय देवगन

अभिनेता अजय देवगन इलान ग्रुपसह मिळून पाच मल्टीप्लेक्स उभारणार आहे. सिनेमा हा मनोरंजनाचे साधन आहे त्यामुळे प्रत्येक गावात, शहरांमध्ये चित्रपटगृह असणे गरजेचे आहे असे अजयला वाटते त्यासाठीच अजय  गुरूग्राममध्ये मल्टीप्लेक्स उभारणार आहे. येत्या चार ते पाच वर्षांत हे चित्रपगृह उभारण्यात येणार आहे.  

बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बॉलिवूड अभिनेता अजय देवगनने गुरुग्राम येथे त्याच्या ‘एनवाय सिनेमा’चे मल्टीप्लेक्स उभारणार असल्याचे सांगितले आहे. हे चित्रपटगृह इतर चित्रपटगृहांपेक्षा वेगळं असल्याचं अजय  म्हणाला. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी या  चित्रपटगृहात विशेष सोय करण्यात येणार आहे. तसेच एपिक मॉलमध्ये नव्या पाच स्क्रीन सुरु होणार असल्याचे त्याने स्पष्ट केले. 

येत्या चार ते  पाच वर्षांत अनेक शहरात २५० हून अधिक स्क्रीन उभारण्याचा अजयच्या  ‘एनवाय सिनेमा’चा मानस असणार आहे. सध्या  संपूर्ण देशभरात ‘एनवाय सिनेमा’च्या फक्त १५ स्क्रीन उपलब्ध आहेत. ‘अजय देवगणच्या एनवाय ग्रुपसह करार करणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. या प्रोजेक्टसाठी अजय देवगण कोट्यवधीची गुंतवणूक करणार आहे. हे सिनेमागृह अत्यंत सुंदर आहे’ असे एलान ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रविश कपूर यांनी म्हटले आहे.