पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजय देवगनच्या 'रेड' चित्रपटाच्या यशानंतर 'रेड २' ही येणार

रेड २

अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला आणि सत्य घटनेपासून प्रेरित असलेल्या रेड या चित्रपटाच्या यशनंतर आता 'रेड २' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टी सीरिजच्या भुषण कुमार यांनी रेड २ च्या कथेला हिरवा कंदील दिला आहे, अशी माहिती सहाय्यक निर्माता सुशान यांनी मुंबई मिररला दिली आहे.  'रेड ही अशा हिरोची गोष्ट आहे जो समाजातील व्हाइट कॉलर लोकांकडून होणाऱ्या गुन्हांचा छडा लावलो. रेड 2 हा चित्रपट त्या व्यक्तीला मानाचा मुजरा असेल जो लोकांसाठी खरा हिरो असेल', अशी प्रतिक्रिया बॉलिवूडमधल्या सुत्रानं वृत्तपत्राला दिली आहे.

Video : ८१ वर्षांच्या मिलिंद सोमणच्या आईचा हा आहे फिटनेस फंडा

रेडला मिळालेल्या भरघोस यशानंतर रेड २ कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अजयच्या चित्रपट करिअरमधला १०० वा चित्रपट तान्हाजी द अनसंग वॉरिअर हा काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. अजय आता भुज- द प्राइड ऑफ इंडिया, चाणक्य आणि थॅक्यू या चित्रपटातही दिसणार आहे.

लॉकडाऊनमुळे महिन्याभरापासून सेटवरच अडकली राधाकृष्ण मालिकेची टीम