पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' ट्रेलर २ : आधी लगीन कोंढाण्याचं...

तान्हाजी द अनसंग वॉरियर

'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' म्हणणाऱ्या तान्हाजी मालुसरेंचं नाव स्वराज्याच्या इतिहासात सूवर्ण अक्षरांनी कोरलं आहे. तहात गेलेला कोंढाण्यासारखा बलाढ्य अन् महत्त्वाचा किल्ला परत मिळवण्यासाठी तान्हाजीशिवाय दुसरं कोणंतही नाव महाराजांना सुचलं नाही. मुलगा रायबाच्या  लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी आलेल्या तान्हाजी मालुसरेंनी स्वराज्याच्या प्रेमापोटी मुलाचं लग्नंही बाजूला ठेवलं. 'आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं' म्हणत  कोंढाणा स्वराज्यात परत आणण्याचं वचन तान्हाजींनी महाराजांना दिलं, अन् वचनपूर्तीसाठी आपल्या प्राणांचं बलिदानही दिलं. 

बॉक्स ऑफिसवर जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध

इतिहास स्वराजाच्या 'सिंहा'नं दिलेल्या बलिदानाचा साक्ष आहे. कोंढाणा किल्ला परत मिळवण्याची महाराजांची मोहीम फत्तेह तर झाली, मात्र स्वराज्याचा सिंह गेला.  'गड आला पण सिंह गेला' म्हणत राजेही हळहळले. याच शौर्यगाथेवर आधारित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. मात्र नुकताच या चित्रपटाचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे पहिल्या ट्रेलरपेक्षाही अधिक दमदार हा ट्रेलर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

'जुमांजी- द नेक्स्ट लेव्हल'ची पहिल्याच आठवड्यात बक्कळ कमाई

“भारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तान्हाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. मला ही कथा आपल्या देशाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली पहायची आहे.” अशी प्रतिक्रिया अजय देवगन यांनी दिली आहे. ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होत आहे. 

बॉक्स ऑफिसवर 'पानिपत'च्या कमाईचं गणित बिघडलं