पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर, अजयचा पहिला लूक प्रदर्शित

तानाजी द अनसंग वॉरियर

स्वराज्य निर्मितीच्या कार्यात महाराजांसाठी प्राणाची आहुती देण्यासाठी  मागे पुढे न पाहणाऱ्या शूर तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अजय देवगनची मुख्य भूमिका असलेल्या 'तानाजी द अनसंग वॉरियर' चित्रपटातील अजयचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे. 

लवकर मतदानास बाहेर पडलेला आमिर पहिलाच बॉलिवूड सेलिब्रिटी

या चित्रपटाच्या घोषणेपासूनच महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता होती. अजयनं तानाजी मालुसरेंच्या वेशातला त्याचा फोटो शेअर केला आहे. १० जानेवारीला स्वराज्याच्या इतिसाहातील हे सूवर्णपान रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. 

या चित्रपटासाठी अजयन खूपच मेहनत घेतली असून तो मराठीही शिकत आहे. ओम राऊत चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून या चित्रपटात सैफ अली खान, काजोल दिसणार अशीही चर्चा आहे. 

घराबाहेर जमलेल्या चाहत्यांची बच्चन यांनी मागितली माफी