पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : चाहत्यांच्या बेशिस्तीमुळे मुलगा घाबरला, अजयचा महत्प्रयासानं रागावर ताबा

अजय- युग देवगनभोवती चाहत्यांचा गराडा

अभिनेता अजय देवगननं मुलगा युगसोबत  अजमेर शरीफ दर्ग्याला भेट दिली. अजयला पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.  त्यामुळे अजय आणि त्याचा लहान मुलगा चाहत्यांच्या गराड्यात अडकला. अनेकांनी धक्काबुक्कीही सुरू केली. हा  सर्व प्रकार पाहून अजयचा मुलगा युगही घाबरला. चाहत्यांवर ताबा मिळवणं पोलिसांनाही अवघड जात होतं. 

Panipat trailer : शौर्यगाथा पानिपतच्या युद्धभूमीवर लढणाऱ्या मराठ्यांची

काही चाहत्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे अजयचंही आपल्या रागावरचं नियंत्रण सुटलं. गर्दीतून बाहेर निघण्यासाठी अजय आणि युग प्रयत्न करत होते. पोलिसांनीही जमावास आवर घालण्याचा प्रयत्न केला याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#AjayDevgan with son Yug gets mobbed at #ajmersharif dargah today #instadaily #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

अनेकदा अजय आपल्या दोन्ही मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. काही महिन्यांपूर्वी अजयच्या मुलीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. 

'अग्गंबाई सासूबाई’ मालिकेतील सोहम आहे फिटनेस ट्रेनर