पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बडे दिलवाला! RRR साठी मानधन घेण्यास अजयचा नकार

RRR मध्ये अजयनं केलं फुटकात काम

गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'तान्हाजी द अनसंग व्हारियर' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम रचले आहेत. गेल्या वर्षभरात सुपरहिट चित्रपट देणार अजय देवगन एस.एस. राजामौलीच्या RRR या चित्रपटात दिसणार आहे. फिल्मफे्अरच्या बातमीनुसार अजयनं या चित्रपटात काम करण्यासाठी मानधन न घेण्याचं ठरवलं आहे. राजामौलींसोबत अजयनची घनिष्ठ मैत्री आहे या मैत्रीसाठीच अजयनं मानधन घेण्यास नकार दिल्याचं समजत आहे. 

PHOTOS : जेव्हा राजा रवि वर्मा यांची सुप्रसिद्ध चित्रं जिवंत होतात

अजय या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. RRRच्या निर्मात्यांनी अजयला मानधनासंदर्भात विचारले होते मात्र अजयनं मानधन घेण्यास नकार दिला. त्यानंतर निर्मार्त्यांनी अजयला कॅमिओसाठी तो आकारत असलेलं मानधन घेण्यासाठी आग्रह केला, मात्र RRR साठी कोणत्याही प्रकारचं मानधन घेण्यास  त्यानं नकार दिला आहे. 

कोरोनाच्या भीतीनं २० दिवसांचं चित्रीकरण केलं रद्द

 RRRमधून अजय देवगन हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ मध्ये प्रदर्शित होत आहे.