पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजयनं सांगितला 'तान्हाजी'मध्ये काजोलसोबत काम करण्याचा अनुभव

तान्हाजी द अनसंग वॉरिअर

अभिनेता अजय देवगन 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात तो तान्हाजी मालुसरेंची भूमिका साकारत आहे.  तर या चित्रपटात अभिनेत्री काजोल ही तान्हाजी मालुसरेंची पत्नी सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे.  अजय  आणि काजोल ही बॉलिवूडमधली लोकप्रिय जोडी आहे. या जोडीनं 'इश्क', 'प्यार तो होना ही था', 'राजू चाचा', 'यु मी और हम', सारख्या चित्रपटात काम केलं आहे.

 'शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा'

बऱ्याच वर्षांनी ही जोडी पडद्यावर पाहायला मिळत आहे. साहजिकच काजोलसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता हा प्रश्न अजयला विचारण्यात आला. तेव्हा काम करतानाचा वेगळा अनुभव अजयनं सांगितला. काजोल आणि अजय हे  पती पत्नी आहेत. त्यामुळे तिच्यासोबत चित्रीकरण करताना सेटवर कमी आणि घरात जास्त वावरत असल्याचा अनुभव येत असल्याचं अजयनं सांगितलं.  आम्ही घरी एकमेकांशी वागतो तसेच वागत असल्याचंही अजयनं  सांगितलं. 

तान्हाजी - द अनसंग वॉरियर : स्वराज्याच्या शूर सिंहाची शूर गाथा

अजय काजोलची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे.