पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्यावर अजय म्हणतो...

अजय देवगन

अभिनेता अजय देवगन तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात करतो तो ज्या उत्पादनाची जाहिरात करतो ते सतत खाऊन माझ्या वडिलांना कॅन्सर झाला त्यामुळे अजयनं आरोग्यास घातक अशा पदार्थांची जाहिरात करणं थांबवावं  अशी विनंती राजस्थानमधल्या ४० वर्षीय अजयच्या चाहत्यानं केली होती. तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात करण्यावर अजयनं स्पष्टीकरण दिलं आहे. 

'मी तंबाखू किंवा तंबाखूजन्य कोणत्याही पदार्थांची जाहिरात करणार नाही हे माझ्या करारामध्ये मी  नेहमीच नमूद करतो.  जी जाहिरात मी केली ती  इलायचीची आहे आणि माझ्या करारामध्ये तो  तंबाखूजन्य पदार्थ नाही असं नमूद केलं आहे. जर कंपनी इलायचीच्या नावाखाली  तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करत असेन तर मला माहिती नाही काय करावं', असं अजय देवगन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

काही दिवसांपूर्वी राजस्थानमधल्या अजयच्या चाहत्यानं गावात जाहिरात पत्रक लावलं होतं. यात अजयला त्यानं तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात न करण्याची विनंती केली होती. माझे वडील अजयचे खूप मोठे चाहते आहे. अजय एका उत्पादनाची जाहिरात करतो. ती जाहिरात पाहून माझ्या वडिलांनी तो पदार्थ सतत खायला सुरूवात केली. मात्र त्यातील तंबाखूजन्य पदार्थामुळे माझ्या वडिलांना कॅन्सर झाला. अजयचा चाहतावर्ग मोठा आहे त्यामुळे त्यानं आरोग्यास घातक अशा पदार्थांची जाहिरात करू नये अशी विनंती नानकराम नावाच्या व्यक्तीनं केली होती. त्यानं यासंबधीचे जाहिरात पत्रकही आजूबाजूच्या गावात वाटले असल्याचं पीटीआयनं म्हटलं होतं. 

अजयनं यावर स्पष्टीकरण दिलं आहे तसेच आपण नानकराम यांच्या कुटुंबींयांच्या संपर्कात असल्याचंही अजयनं म्हटलं आहे. दे दे प्यार दे चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अजयनं माध्यमांशी  संवाद साधला. या संवाद कार्यक्रमात अजयनं आपली बाजू मांडली.