पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजय देवगन घेतली आलिशान कार, फक्त दोन भारतीयांकडेच आहे ती कार

अजय देवगन घेतली आलिशान कार

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन महागड्या आणि आलिशान गाड्यांचा चाहता आहे. त्याच्याजवळ अनेक महागड्या गाड्या आहेत. आता अजयनं Rolls Royce Cullinan ही जगातील सर्वात महागडी आलिशान कार खरेदी केली आहे. भारतात आतापर्यंत ही महागडी कार केवळ दोन श्रीमंत व्यक्तींकडेच आहेत. Rolls Royce Cullinan खरेदी करणारा अजय हा भारतातला तिसरा व्यक्ती ठरला आहे. 

...म्हणून अभिनेता आमिर खानचे पंतप्रधानांनी मानले आभार

या आलिशान एसयुव्ही कारची किंमत जवळपास ६.९५ कोटी असल्याचं समजत आहे. ही कार भारतात केवळ अब्जाधीश मुकेश अंबानी  आणि टी- सीरिजचे भूषण कुमार यांच्याजवळच आहे. ही आलिशान कार सर्वात पहिल्यांदा मुकेश अंबानी  यांनी खरेदी केली होती.  अजय देवगनकडे ऑडी, बीएमडब्ल्यू, मर्सडिज्, लँड रोवर, वॉल्वोसारख्या अनेक महागड्या आलिशान कार आहेत. 

मलायका-अर्जुन पुन्हा सुट्टीवर

अजयला महागड्या गाड्या आणि स्पोर्ट कारची आवड आहे. ही गाडी अजयची आवड आणि त्यानं दिलेल्या सुचनेनुसार तयार करण्यात आली आहे. अजय हा सध्या आपल्या विविध चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. तो लवकर तुर्रम खान, तानाजी द अनसंग वॉरिअर, मैदान, भुज द प्राईड ऑफ इंडिया आणि RRR या तीन चित्रपटात दिसणार आहे.