पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिसवर 'तान्हाजी'ची कमाल, ६० कोटींची कमाई; 'छपाक' खूप मागे

तान्हाजी आणि छपाक हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाले.

अभिनेता अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर'ने बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवली असून, गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'छपाक'च्या तुलनेत तान्हाजीने खूप चांगले उत्पन्न कमावले आहे. विशेष म्हणजे रविवारी एकाच दिवसात तान्हाजीच्या उत्पन्नात ३० टक्क्यांची वाढ झाली. या दिवशी देशात तान्हाजीने २५ ते २६ कोटी रुपये कमाविल्याचे बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालात म्हटले आहे. शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत तान्हाजीने बॉक्स ऑफिसवर ६१.६५ कोटी रुपये कमाविले. तर दुसरीकडे छपाकने १९ कोटी रुपये कमाविले आहेत.

शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे द्यावेतः संजय राऊत

अभिनेता दीपिका पदुकोण हिची प्रमुख भूमिका असलेल्या 'छपाक'कडे अनेकांचे लक्ष आहे. त्यातच दीपिका पदुकोण हिने दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर तिच्यावर काही जणांनी जोरदार टीका केली. तर काहींनी तिच्या या कृतीचे कौतुक केले. या पार्श्वभूमीवर छपाक प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर किती चांगला व्यवसाय करतो, याकडे चित्रपट वर्तुळाचे लक्ष आहे.

अजय देवगणचा गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला 'टोटल धमाल' सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत ६२.४० कोटी रुपयांचे उत्पन्न कमाविले होते. त्याचा दुसरा सिनेमा 'दे दे प्यार दे' हा सुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याचा तान्हाजी सिनेमा हिट ठरण्याच्या मार्गावर आहे. तान्हाजी सिनेमाला मुंबई शहर आणि उपनगर, आंध्र प्रदेश या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 

बैठकीपूर्वीच विरोधकांच्या एकीला सुरूंग, आता मायावतीही काँग्रेसविरोधात

छपाकने रविवारी बॉक्स ऑफिसवर ७ ते ७.५० कोटी रुपयांची कमाई केली. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी या सिनेमाने ४.७७ कोटी रुपये कमावले होते. त्याचवेळी तान्हाजीने पहिल्या दिवशी १५.१० कोटी रुपये कमावले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ajay Devgn film crosses Rs 60 crore in first weekend Deepika Padukone-starrer makes Rs 19 cr