पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'गोलमाल ५' येणार, अजय- रोहितचा दुजोरा

रोहित- अजय

'गोलमाल' सीरिजला  कित्येक वर्षांत प्रेक्षकांकडून मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता  लवकरच 'गोलमाल ५' ही येणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि मुख्य अभिनेता अजय  देवगन या दोघांनी 'गोलमाल ५' येणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'गोलमाल फाइव्ह' असं चित्रपटाचं नाव असणार आहे. 

टायगरनं घेतलं ८ बेडरुम्सचं आलिशान घर

 रोहित आणि मी या चित्रपटाचा पाचवा भाग काढण्याचं निश्चित केलं आहे. या चित्रपटाचा समावेश आता  सर्वाधिक भाग प्रदर्शित झालेल्या चित्रपटात होणार आहे, या चित्रपटाचा भाग होण्याचा आनंद मला असल्याचंही अजय म्हणाला. 

या चित्रपटाची कथा रोहितकडून निश्चित करण्यात आली आहे, काही महिन्यात चित्रीकरणाला सुरूवातही होणार आहे.  १४ जुलै २००६ मध्ये चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.  यात अजय देवगन, अर्शद वारसी, शरमन जोशी, तुषार कपूर, परेश रावल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

त्यानंतर गोलमाल रिटर्न, गोलमाल ३  आणि गोलमाल अगेन हे चित्रपटही आले. या चित्रपटांत  करिना कपूर, अमृता अरोरा, कुणाल खेमू, श्रेयस  तळपदे, तबू, परिणीती चोप्रा सारखे कलाकारही  पाहायला मिळाले होते. 

आयुष्मानचा भाव वधारला, मिळाल्या पूर्वीपेक्षा चौपट जाहिराती