पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अजय देवगनच्या चित्रपटांचं शतक, 'तान्हाजी' ठरला १०० वा चित्रपट

अजय देवगनच्या चित्रपटांची सेंच्युरी

अभिनेता अजय देवगननं बॉलिवूडध्ये तीन दशकांचा प्रवास पूर्ण केला आहे. अॅक्शन, रोमॅन्स, कॉमेडी अशा विविध प्रकारच्या भूमिकेत  सहज सामावून जाणारा अजय 'तान्हाजी' या ऐतिहासिक चित्रपटात तान्हाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'पानिपत''च्या ट्रेलरचं राज ठाकरेंकडून कौतुक

अजयच्या बॉलिवूड करिअरमधील  'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर'  हा १०० वा चित्रपट ठरला आहे. अजयच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम भूमिकांचा समावेश असलेला व्हिडीओ तयार करण्यात आला असून अजयची पत्नी आणि अभिनेत्री काजोलनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. काजोलनं अजयला शुभेच्छा दिल्या आहे. 

काजोलबरोबरच अभिनेता शाहरूख खाननंही अजयला शुभेच्छा दिल्या आहे. अजयचा बहुप्रतिक्षीत असा  'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर'  चित्रपट १० जानेवारी २०२० ला प्रदर्शित होत आहे. 

...म्हणून अमिताभ बच्चन 'KIFF'मध्ये सहभागी झाले नाहीत