पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मणिरत्नमच्या ऐतिहासिक चित्रपटात ऐश्वर्या खलनायिका

ऐश्वर्या राय बच्चन


 विश्वसुंदरी ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटात अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली मात्र बऱ्याच वर्षांनंतर ऐश्वर्या खलनायिकेच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.  मणिरत्नम यांच्या पोंनियिन सेलवन या चित्रपटासाठी ऐश्वर्यानं होकार दिला होता या चित्रपटात सत्तेसाठी आसुसलेल्या खलनायिकेच्या भूमिकेत ऐश्वर्या दिसणार आहे. 

ऐश्वर्या या चित्रपटात चोल साम्राज्याचे  खजिनदार पेरिया पज्हवेत्तुरायर यांच्या पत्नी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्तेसाठी आसुसलेली स्त्री  पतीला कटकारस्थानात सहभागी करून चोल  वंशाच्या  पतनाची शप्पथ घेते. भूतकाळात याच वंशामुळे सहन कराव्या लागलेल्या मानहानीचा  प्रतिशोध ती  घेते तिच्या प्रतिशोधाची, हट्टाची, लालसेची कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. मिड डेच्या माहितीनुसार ऐश्वर्याची निवड मणिरत्नम यांनी नंदिनीच्या भूमिकेसाठी  केली आहे. ऐश्वर्यानंही या भूमिकेसाठी  होकार दिला  असल्याचं समजत आहे. यापूर्वी 'खाकी' चित्रपटात ऐश्वर्यानं खलनायिकेची भूमिका साकारली होती. युवा राजकुमार अरुल्मोज्हिवर्मन जो चोल साम्राज्याचा महान सम्राट म्हणून ओळखला  जातो  या सम्राटाच्या जीवनावर  पोंनियिन सेलवन आधारलेला असेन.

हा चित्रपट कलकी लिखीत प्रसिद्ध कांदबरी पोंनियिन सेलवनवर आधारलेला आहे. पोंनियिन सेलवन हा मणिरत्नम यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. मणिरत्नम यांच्यासोबत ऐश्वर्यानं रावण या चित्रपटात काम केलं होतं.  अमिताभ बच्चनदेखील या चित्रपटात पहायला मिळणार अशी चर्चा आहे.  या चित्रपटासाठी मोठे सेट उभारण्याचं काम सध्या सुरू आहे.  सेट उभारून झाल्यानंतर या वर्षाअखेर चित्रपटाला सुरूवात होणार आहे. गेल्या दहा वर्षांपासून मणिरत्नम हा चित्रपट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडत आहेत.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Aishwarya Rai Bachchan will reportedly play power hungry woman role in Mani Ratnam movie