पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मणिरत्नमच्या ऐतिहासिक चित्रपटासाठी ऐश्वर्याचा होकार

ऐश्वर्या राय बच्चन

गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मणिरत्नम यांच्या 'पोंनियिन सेलवन' या महत्त्वाकांक्षी चित्रपटासाठी ऐश्वर्यानं अखेर होकार दिला आहे. तिनं या चित्रपटात काम करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 

हा चित्रपट कलकी लिखीत प्रसिद्ध कांदबरी पोंनियिन सेलवनवर आधारलेला आहे. पोंनियिन सेलवन हा मणिरत्नम यांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. या चित्रपटात ऐश्वर्या कोणती भूमिका साकरणार याची अधिकृत घोषणा अजूनही झाली नाही. मात्र ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा आहे. 

सलमानमुळे बदललं नाव, मात्र 'किआरा' नावाची प्रेरणा प्रियांकापासून

ऐश्वर्या या चित्रपटात चोल साम्राज्याचे  खजिनदार पेरिया पज्हवेत्तुरायर यांच्या पत्नी नंदिनीच्या भूमिकेत दिसणार आहे. सत्तेसाठी आसुसलेली स्त्री  पतीला कटकारस्थानात सहभागी करून चोल  वंशाच्या  पतनाची शप्पथ घेते. भूतकाळात याच वंशामुळे सहन कराव्या लागलेल्या मानहानीचा  प्रतिशोध ती  घेते तिच्या प्रतिशोधाची, हट्टाची, लालसेची कहाणी या चित्रपटात पहायला मिळणार आहे. मिड डेच्या माहितीनुसार ऐश्वर्याची निवड मणिरत्नम यांनी नंदिनीच्या भूमिकेसाठी  केली आहे.

टीक टॉक व्हिडीओमुळे महिला पोलिसाचं निलंबन

यापूर्वी 'खाकी' चित्रपटात ऐश्वर्यानं खलनायिकेची भूमिका साकारली होती.  'मणिरत्नम यांच्या आगामी चित्रपटात मी काम करत आहे. तुर्त या चित्रपटाविषयी मी काहीही बोलणं योग्य ठरणार नाही, मणिरत्नम हे माझे गुरू आहे. माझा पहिला चित्रपट मी त्यांच्यासोबत केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्यासोबत काम करण्यास मी उत्सुक असल्याचं ऐश्वर्या 'द हिंदू'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.