पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे मीका सिंहवर AICWA ची बंदी

मीका सिंह

बॉलिवूडमधील गायक मीका सिंहवर 'ऑल इंडिया सिने वकर्स असोशिएशन'नं (AICWA) बंदी घालती आहे. पाकिस्तानातील एका  कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मीका सिंहवर ही बंदी घालण्यात आली आहे. मीकानं पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या  कार्यक्रमात  उपस्थिती लावली. कराचीमध्ये ८ ऑगस्टरोजी झालेल्या कार्यक्रमात तो  सहभागी झाला होता. त्यामुळे त्याच्यावर ऑल इंडिया सिने वकर्स असोशिएशननं बंदी घातली असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनं दिली आहे. 

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांसाठी बिग बी करणार मदत

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणावपूर्ण संबंध आहेत. पठाणकोट, पुलवामा हल्ला झाला तरीही मीका सिंग सारखा कलाकार पाकिस्तानात जाऊन कार्यक्रम करतो. राष्ट्राभिमानापेक्षा मीकाला पैसे आणि त्याचा व्यवसाय महत्त्वाचा वाटतो, अशी बोचरी टीका AICWAनं केली आहे. 

'खतरो के खिलाडी'मध्ये जाण्यापूर्वी आईचा अमृताला हा मोलाचा सल्ला

यापुढे मीकासोबत कोणीही काम करणार नाही, जी व्यक्ती किंवा संस्था मीकासोबत काम करेन त्यांना कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागेल असं AICWAकडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.