पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डर'नंतर शाहरूखशी १६ वर्षे सनी देओलनं धरला अबोला

डर

अभिनेते सनी देओल यांनी तब्बल १६ वर्षे शाहरूख खानशी अबोला धरला होता. नुकतीच एका टीव्ही कार्यक्रमात सनी यांनी ही गोष्ट मान्य केली. 'डर' चित्रपटात शाहरूख, जुही चावला आणि  सनी हे तिघंही एकत्र झळकले होते. मात्र हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मी शाहरूखशी बोलणं पूर्णपणे बंद केल्याचं त्यांनी मान्य केलं. 

बिग बॉस मराठी २ : हिनामुळे पराग-रुपालीच्या प्रेमाचा रंग उडणार, दिगंबरचं भविष्य

'डर चित्रपट प्रदर्शित झाला तो सर्वांनाच आवडला. माझ्या भूमिकेचं कौतुक झालं. शाहरूखही सर्वांच्या पसंतीस उतरला मात्र  याचवेळी चित्रपटात एका खलनायकाला जास्त अधोरेखित करण्यात आलं ही बाब मला  खूपच खटकली', असं ते एका वृत्तवाहिनीच्या चॅटशोमध्ये म्हणाले. इतकंच नाही तर यापुढे कधीही यश चोपडा यांच्यासोबतही  काम करणार नसल्याचंही ते  म्हणाले. 

सलमान म्हणजे 'कागदी वाघ', गायिका सोना महापत्राची टीका

'यश चोप्रा कधीही दिलेला शब्द पाळत नाही. मी  कधीही यश चोप्रा यांच्यासोबत काम करणार नाही. त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव अजिबात चांगला नव्हता. त्यांनी  माझा विश्वासघात केला आहे', असंही सनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.