पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बॉइज' आणि 'बॉइज २' नंतर येणार 'गर्ल्स'

गर्ल्स

'बॉइज' आणि 'बॉइज २' या दोन्ही चित्रपटांच्या भरघोस यशानंतर विशाल सखाराम देवरुखकर आता नवा चित्रपट घेऊन येत आहेत. हा चित्रपट म्हणजेच 'गर्ल्स' होय. 

अभिनेत्री श्वेता तिवारीची पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार

मुलांसारख्या मुली कधीच एकमेकींच्या जिवाभावाच्या मैत्रिणी असू शकत नाही. मात्र हे साफ चुकीचे आहे. मुलींसारखी मैत्री आणि त्या मैत्रीत होणारी धमाल ही कुठेच पाहायला मिळत नाही. ‘व्हाय शूड बॉइज हॅव ऑल द फन’ या वाक्याला  मात देत, मुलीसुद्धा मुलांएवढीच किंवा मुलांपेक्षा जास्त मजा करू शकतात. मुलींमध्ये होणारे संभाषण त्यांच्यात होणारे किस्से हे फक्त मुली स्वतः पुरताच ठेवतात. बऱ्याच लोकांना त्यांच्या या विश्वाबद्द्ल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. याच उत्सुकतेचे उत्तर 'गर्ल्स' या चित्रपटातून मिळणार आहे. 'गर्ल्स' हा चित्रपट तरुणींच्या अवतीभवती फिरणारा आणि त्यांचे भावविश्व उलगडणारा मराठीतील  पहिला सिनेमा असणार आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही." अशी प्रतिक्रिया विशाल देवरुखकर यांनी दिली आहे. 

'त्या' ट्विटवर सवाल उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानी मुलीला प्रियांकाचं सडेतोड उत्तर

''वीस वर्षांपूर्वी मराठीमध्ये तरुणींवर आधारित 'बिनधास्त'  हा चित्रपट आला होता. तो सुपरहिट ठरला. आता तब्बल वीस वर्षांनी तरुणींवर आधारित 'गर्ल्स' हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.", अशी प्रतिक्रिया निर्माते  नरेन कुमार यांनी दिली. 
या चित्रपटात कोणत्या अभिनेत्रींची वर्णी लागते हे पाहण्यासारखं ठरणार आहे. मात्र त्यासाठी प्रेक्षकांना १५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.