पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अदितीनं गमावले परदेशी चित्रपट कारण ऐकून तिही झाली अवाक्

अदिती राव हैदरी

अदिती राव हैदरी हा बॉलिवूडमधला परिचयाचा चेहरा आहे. अदितीनं 'पद्मावत', 'लंडन पॅरिस न्यूयॉर्क', 'वझिर' यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. तिनं अनेक दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलं आहे. अदितीनं बॉलिवूड किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपुरताच आपलं क्षेत्र मर्यादित ठेवलं नाही. तिनं आपल्या कक्षा विस्तारल्या आहेत.

..तर आमिरऐवजी 'मोगुल'मध्ये कपिल शर्मानं साकारली असती गुलशन कुमार यांची भूमिका

ती अनेक परदेशी चित्रपटांसाठीही आपलं नशीब आजमावत आहे.  आतापर्यंत अनेक परदेशी चित्रपटांसाठीही तिनं ऑडिशन दिल्या आहेत. मात्र चांगली ऑडिशन देऊनही तिला अनेक ठिकाणी नकार ऐकावे लागले आहेत. यामागचं कारण ऐकून अदिती स्वत: अवाक् झाली आहे. ती भारतीय महिलांसारखी दिसत नाही असं कारण अनेकांनी तिला दिला.

अभिनेत्री रवीना टंडन होणार आजी

मी पारंपरिक भारतीय नारीसारखी दिसत नाही असं नकार देण्यामागचं कारण अनेकदा मला ऐकायला मिळालं आहे. याउलट भारतीय चित्रपटात  मला पारंपरिक भारतीय महिलेच्या भूमिका वाट्याला येतात. मी साडी किंवा पारंपरिक पेहरावात उठून दिसते मला येणाऱ्या भूमिकाही तशाच आहेत. मॉर्डन भूमिकांसाठी मला क्वचितच विचारलं जातं. मात्र परदेशी दिग्दर्शक, निर्माते वेगळीच कारणं देतात ती कारणं ऐकून कधी कधी मलाच धक्का बसतो असं अदिती म्हणाली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:aditi rao hydari lost foreign films told her she does not look like conventionaly indian