पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लंडनमध्ये असलेल्या आदिनाथला येतेय मुंबईची आठवण...

आदिनाथ कोठारे

आदिनाथ कोठारे हा लवकरच '८३' या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. भारतानं जिंकलेल्या पहिल्या क्रिकेट विश्वचषकाची गोष्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, दीपिका पादुकोनसह अनेक प्रसिद्ध चेहरे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी आदिनाथ कोठारे २६ मेपासून लंडनमध्ये वास्तव्यास आहे. 

'नेटफ्लिक्स'च्या सुपरहिरो चित्रपटात प्रियांकाची वर्णी

लंडनमधल्या वास्तव्यात अनेकदा घरची आठवण येते. मीच नाही तर चित्रपटाच्या संपूर्ण टीमला घरची आठवण येते मात्र कधीकधी कामाच्या उत्साहानं सर्व क्षीण निघून जातो, असं आदिनाथ म्हणाला.

कोल्हापूर, सांगली पूरग्रस्तांना मदत करण्याचं कपिल शर्माचं आवाहन

या चित्रपटात अकराहून अधिक कलाकार आहेत. आदिनाथनं या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभवही सांगितला. हे सर्वच कलाकार आपापल्या क्षेत्रात नावाजलेले आहेत,  मात्र कोणालाही याचा अहंकार नाही माझी प्रत्येकाशीच घट्ट मैत्री झाली आहे ही मैत्री भविष्यातही कायम राहणार असंही आदिनाथ म्हणाला. 

लाजेखातर प्रेक्षकांना ग्राह्य धरा, बिग बॉसवर परागची टीका