बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरामध्ये दुसऱ्यांदा पाळणा हालला आहे. शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा आई झाली असून तिला कन्यारत्न झाले आहे. सरोगसीच्या आधारे त्यांनी मुलीला जन्म दिला आहे. शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शिल्पा आणि राजने त्यांच्या लेकीचे नाव 'समीषा' असे ठेवले आहे.
'अतरंगी रे' मध्ये साराचा डबल रोल?
शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्रामवर चिमुकलीने तिचे बोट पकडल्याचा फोटो शेअर केला आहे. १५ फेब्रुवारी रोजी कन्यारत्न झाल्याची माहिती तिने दिली आहे. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तिने चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे. बॉलिवूड कलाकारांसह शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
कमल हासन यांच्या 'इंडियन २'च्या सेटवर अपघात, ३ मृत्युमुखी
दरम्यान, शिल्पाने असे म्हटले आहे की, 'ओम गणेशाय नम: आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळाले. आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की नन्ही परीचे आमच्या घरी आगमन झाले आहे. आमच्या घरी जुनिअर एसएसके आली आहे. समीषाचा १५ फेब्रुवारीला जन्म झाला.' तर, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा याचे २००९ साली लग्न झाले होते. २०१२ मध्ये शिल्पाने पहिला मुलगा विआनला जन्म दिला होता.