पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रियांका चोप्राच्या अविस्मरणीय आठवणींचा व्हिडिओ तुम्ही पाहिलात का?

प्रियांका चोप्रा

नवीन वर्षाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या सर्व चाहत्यांसाठी एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रियांका चोप्राने २०१९ मधील अनेक अविस्मरणीय क्षण जोडून हा व्हिडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये 'मॅडम तुसाद म्युझियम'पासून ते 'द स्काय इज पिंक' या चित्रपटापर्यंतचे खास क्षण या व्हिडिओमध्ये आहेत. तसंच या व्हिडिओमध्ये प्रियांकाने वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचे क्षण टाकले असून त्यात पती निक जोनास देखील दिसत आहे.

 साईबाबांचे आशिर्वाद घेत सोनू सूदने केले नवीन वर्षाचे स्वागत

प्रियांका चोप्राने या व्हिडिओला इन्स्टाग्रामवर शेअर करत असे म्हटले आहे की, 'आणखी एक वर्ष आणखी एक गिफ्ट. २०२० च्या गिफ्ट बॉक्समध्ये काय असेल याची प्रतिक्षा करु शकत नाही. देवाचे आणि त्या सर्वांचे मी आभार मानते ज्यांनी माझे आयुष्य आनंदाने भरले आहे.' दरम्यान, प्रियांकाच्या या व्हिडिओला तिच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून प्रियांका चोप्राने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अनुष्काच्या या कलेचं विराटकडून कौतुक