पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

VIDEO: नीतू कपूर यांचा तमिळ बोलतानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल

ऋषि कपूर आणि नीतू कपूर

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर आणि त्यांची पत्नी नीतू कपूर  यांनी मायदेशी परतल्यानंतर बालाजीचे दर्शन घेतले. नीतू कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्याठिकाणचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्या तमिळ भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत. त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून त्यांच्या चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

After taking blessings of Balaji 🙏🌸entertaining them with a Tamil tongue twister 😂

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

वीणाने दिलेले बर्थडे गिफ्ट पाहून शिव झाला थक्क

नीतू कपूरने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट करत सांगितले की, 'बालाजीच्या दर्शनासाठी गेलो होता. त्यानंतर मी तमिळ भाषा बोलण्याचा प्रयत्न केला.' तमिळ भाषा बोलायला अतिशय कठीण आहे. तरी देखील नितू यांनी ती बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांची तमिळ भाषा बोलण्याची पध्दत खूप चांगली असून त्यांचे खूप कौतुक होत आहे. 

महेश भट्ट यांच्या निधनाची अफवा पसरवणाऱ्यांवर संतापली पूजा भट्ट

नीतू कपूर यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला त्यांच्या चाहत्यांनीच नाही तर त्यांच्या मित्र परिवाराने देखील पसंती दिली आहे. एकता कपूर, रवि कपूर, यशराज फिल्म्स कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा आणि शिल्पा शिरोडकर यांनी त्यांच्या या पोस्टला लाईक केले आहे. ऐवढेच नाही तर तुम्ही मागच्या जन्मात तमिळ होता का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांनी विचारला आहे. दरम्यान, ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची बॉलिवूडमधील एक लोकप्रिय हिट जोडी मानली जाते. 

VIDEO: 'दबंग ३' च्या सेटवर सायकलवरुन पोहचला सलमान