पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चोरीचा मामला' चित्रपटात श्रध्दाच्या भूमिकेत दिसणार 'ही' अभिनेत्री

चोरीचा मामला चित्रपट

अभिनेत्री अमृता खानविलकर 'चोरीचा मामला' या चित्रपटात धमाल भूमिकेत दिसणार आहे. तिचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात अमृतानं श्रद्धा ही महत्त्वाची भूमिका साकारली आहे. हातात पिस्तुल असलेली ग्लॅमरस अमृता या पोस्टरवर दिसत आहे. 

दीपिकाचा नकार? लवच्या चित्रपटात दिसणार रणबीर- श्रद्धा

सध्या सोशल मीडियात 'चोरीचा मामला' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांची फौज या चित्रपटात पहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील नंदन या व्यक्तिरेखेतील जितेंद्र जोशीचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता अमृताचा लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. 

भन्साळींच्या महत्त्वाकांक्षी चित्रपटात दिसणार होते शाहरुख- सलमान, पण...

मस्का" या चित्रपटानंतर प्रियदर्शन जाधवचा दिग्दर्शक म्हणून चोरीचा मामला हा दुसरा चित्रपट आहे. प्रियदर्शननंच चित्रपटाचं लेखन, चिनार महेश यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. ३१ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

फोर्ब्समध्ये कंगनाच्या उत्पन्नाचे आकडे चुकीचे बहिणीचा दावा, मागितला पुरावा