पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मित्राच्या डिनर पार्टीत कतरिना आणि विकी दिसले एकत्र

मित्राच्या डिनर पार्टीत कतरिना आणि विकी दिसले एकत्र

गेल्या वर्षभरापासून कतरिना कैफ आणि विकी कौशल हे नाव चर्चेत आहे. हे  दोघंही सिंगल आहेत. विकी कौशलनं  गेल्याच वर्षी आपल्या प्रेयसीसोबत ब्रेकअप केलं. या ब्रेकअपसाठी कतरिना कैफ जबाबदार असल्याचं म्हटलं जात होतं, तर काहीच दिवसांनी अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबतची विकीची वाढती जवळीक यासाठी कारणीभूत ठरल्याचीही चर्चा रंगू लागली.

कुशल बेजबाबदार वडील होता, आत्महत्येनंतर पत्नीचा आरोप

 एका मुलाखतीत कतरिनाला डेट करण्याची इच्छा विकीनं व्यक्त केली होती. कतरिना आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत मात्र दोघांनीही याविषयी न बोलणंच पसंत केलं. एका कॉमन मित्राच्या पार्टीत कतरिना आणि विकीला  एकत्र पाहण्यात आलं. या दोघांच्याही मित्रानं डिनर पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीसाठी कतरिना आणि विकी दोघंही दिसले.

भारतात विद्यार्थ्यांपेक्षा गायी सुरक्षित; ट्विंटकलची खोचक टिप्पणी

त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कतरिना ही लवकरच 'सूर्यवंशी' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तब्बल दहा वर्षांनी ती  अक्षय कुमारसोबत काम करत आहे. तर विकी कौशल हा 'सरदार उधम सिंग' यांच्या बायोपीकमध्ये दिसणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actors Vicky Kaushal and Katrina Kaif were spotted enjoying themselves on a dinner outing