पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विवेक ओबेरॉयकडून ते ट्विट डिलिट, माफीही मागितली

विवेक ओबेरॉय

एक्झिट पोलवर आधारित एक मीम शेअर करण्यावरून अभिनेता विवेक ओबेरॉय याच्यावर सर्व स्तरांतून टीका होऊ लागल्यानंतर त्याने मंगळवारी सकाळी ते ट्विट त्याच्या ट्विटर हँडलवरून काढून टाकले. त्याचबद्दल घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. रविवारी एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर अभिनेत्री ऐश्वर्याच्या समावेश असलेले एक मीम सोशल मीडियावर आले होते. ते विवेक ओबेरॉय याने त्याच्या हँडलवरून शेअर केले होते. यावरून त्याच्यावर टीका करण्यात आी. या प्रकरणावरून राज्य महिला आयोगाने त्याला नोटिसही बजावली होती.

'त्या' मीमवरून विवेक ओबेरॉयला राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

एक्झिट पोल हे ऐश्वर्या आणि विवेकच्या नात्यासारखे असतात तर मतदानाचे निकाल हे अभिषेक ऐश्वर्याच्या नात्यासारखे असतात, असे या वादग्रस्त मीममध्ये म्हटले होते. त्याने हे ट्विट शेअर केल्यावर ते अनेकांच्या नजरेत आले आणि मग विवेक ओबेरॉयवर टीका होऊ लागली. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही त्याच्या या कृतीवर नापसंती दर्शविली होती. सोनम कपूरसह अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे या मीमची गंभीर दखल घेत राज्य महिला आयोगाने त्याला नोटीस बजावली होती. 

पहिल्यांदा विवेक ओबेरॉयने या कृतीबद्दल माफी मागण्यास नकार दिला होता. मी केवळ ते मीम शेअर केले होते. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा विषय नव्हता. केवळ हलका-फुलका विनोद होता, असे विवेक ओबेरॉयने म्हटले होते. पण अखेर मंगळवारी सकाळी त्याने पुन्हा एक ट्विट करून घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. जर ते मीम शेअर करण्यामुळे एकाही महिलेला अपमानास्पद वाटले असेल तर मी त्याबद्दल माफी मागतो, अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Actor Vivek Oberoi apologises day after tweeting a meme featuring Aishwarya Rai Bachchan deletes the tweet