पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून कंगनावर तापसी नाराज

तापसी पन्नू- कंगना

कंगना आणि तापसी या दोघींमध्ये गेल्या महिनाभरापासून 'कोल्ड वॉर' सुरू आहे. अशातच आता चित्रपटाला पाठिंबा न देणाऱ्या  कंगनावर तापसीनं नाराजी व्यक्त केली आहे. तापसी पन्नूसह, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, क्रिती कुल्हारी, नित्या  मोहन यांची प्रमुख भूमिका असलेला  'मिशन मंगल' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट महिला सबलीकरण, महिला वैज्ञानिकांचं मंगळयान मोहिमेतील योगदानावर भाष्य करतो. मात्र कंगनानं या चित्रपटाला पाठिंबा दिला नाही म्हणून तापसी नाराज आहे.

अशी मिळाली अमृताला 'Sacred Games 2' मध्ये भूमिका

महिलांनी महिलांना सहाय्य केलं पाहिजे, एकमेकांच्या प्रगतीसाठी मदत केली पाहिजे, एकमेकींना पाठिंबा दिला पाहिजे असं कंगना मानते. या चित्रपटात पाच महिला अभिनेत्री आहेत मग कंगनानं कौतुक का केलं नाही? असा प्रश्न तापसीनं मिड डेला दिलेल्या मुलाखतीत विचारला आहे. 
कंगना अभिनेत्री म्हणून मला खूप आवडते. मात्र गेल्या काही दिवसांपासून जो वाद सुरू आहे त्यामुळे मला धक्का बसला आहे. तुमच्या आवडत्या व्यक्तींकडून अशाप्रकारची प्रतिक्रिया येणं मुळीच अपेक्षित नसते असंही तापसी म्हणाली. 

बिग बॉस मराठी : किशोरीताईंनी शिवला बांधली राखी